महाराष्ट्रातील पहिला पत्रकारांचा पुरुष बचत गट बारामती तालुक्यात स्थापन
महाराष्ट्रातील पहिला पत्रकारांचा पुरुष बचत गट बारामती तालुक्यात स्थापन
सुपे ता.बारामती येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते
पुणे - प्रतिनिधी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व ग्रामीण भागातील पत्रकारांचे संघटन करण्यासाठी काही सामाजिक तारावर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग असलेल्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने बारामती तालुक्यात पुरुष पत्रकार बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेच्यावतीने प्रसिद्धीमाध्यमांना देण्यात आली. राज्यातील हा पहिलाच बचत गट गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाचा प्रयत्न आहे.
सुपे ता बारामती येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कटाची स्थापना करण्यात आली. या पहिल्या गटात एकूण वीस सभासद सहभागी आहेत. सध्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांची होणारी आर्थिक कोंडी लक्षात घेता हा उपक्रम आदर्शवत ठरणार आहे. मुंबई मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुक्यात 40 सभासद आहेत. येथील अनेक जण नोकरी तर काही जोडव्यवसाय म्हणून पत्रकारिता करतात. दरम्यान पत्रकारिता आहे सगळ उपजीविकेचे साधन नाही यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
नव्याने स्थापन झालेल्या बचत गटातून यापुढील काळात आर्थिक गणिते जुळवणे सुलभ सोयीचे ठरणार आहे. बारामती तालुक्यातील परंतु विविध गावातील पत्रकारिता करणारे सभासद एकटाच यानिमित्ताने एकत्र आले आहेत. सध्या राज्यात शेतकरी , महिला यांचे बचत गट कार्यान्वित आहेत. परंतु पत्रकारांचा मात्र एकही गट स्थापन करण्यात आला नव्हता. याच पार्श्वभूमीवर या सभासदांना एकत्र येऊन बचत गटाची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाचे अनेक जाणकार लोकांनी कौतुक केले. अशी माहिती पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष मनोहर तावरे यांनी निवेदनाद्वारे दिले आहे.
पत्रकारांचा बचत गट स्थापन व्हावा यासाठी पत्रकारांचे नेते एस एम देशमुख यांचेसह मुंबई पत्रकार परिषदेचे वरिष्ठ सहकारी शरद पाबळे सह बापूसाहेब गोरे व पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर सर यांनी मार्गदर्शन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. नुकतेच विजयादशमी दिवशी गटाची स्थापना करून काल ता.२ नोव्हेंबर रोजी बँकेत हे खाते खोलत आले. यापुढील काळात संपूर्ण राज्यात पत्रकारांचे बचत गट स्थापन व्हावेत अशी या मागील भूमिका आयोजकांनी व्यक्त केली.