आठ घरफोड्या करणाऱ्या आरोपीला बारामती शहर पोलिसांनी केली अटक
बारामती /प्रतिनिधी: बारामती शहर व परीसरात एकूण आठ घरफोडी चोऱ्या करुन सोन्या -चांदीचे दागिने इतर साथीदाराच्या मदतीने लुटणाऱ्या आरोपीला बारामती शहर पोलासांनी अटक केली आहे. अटक केल्या केल्या नंतर त्याच्याकडून चोरीतील 2 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. बेरड्या उर्फ नियोजन संदीप भोसले (वय २८, रा. सोनगाव, ता. बारामती ) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ५०१/२०२० भा.द.वि कलम ३७९ मधील चोरीस गेलेल्या चंदनाचा व आरोपीचा शोध चालू असताना, आरोपी बेरड्या उर्फ नियोजन संदीप भोसले मळद गावच्या हद्दीत चंदनाची झाडे चोरण्यासाठी रेखी करीत असल्याची गुप्त बातमी मिळाल्याने तेथे जाऊन पोलीस पथकाने त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चंदन तोडण्यासाठी लागणारी कु-हाड, करवत, लोखंडी गिरमिट असे साहित्य मिळूून आले.त्यास चंदन चोरीचे गुन्ह्यात अटक करून तपास केला असता, आरोपी बेरड्या उर्फ नियोजन संदीप भोसले याने साथीदार गांगुली भोसले व इतर साथीदाराांसह बारामती शहर परिसरात एकुण ७ ते ८ घरफोड्या केल्याचे कबुली दिली. आरोपीकडून घरफोडीचे एकुण ८ गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने कि.रू २ लाख 62 हजार रूूपये किंमतीचा ऐवज हा जप्त करण्यात आलेला आहे.
यामध्ये ६० हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे नेकलेस १६ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या रिंगा, २१ हजार किंमतीची सोन्याची अंगठी , ६० हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे गंठण, ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी , कानातील सोन्यचे जुबे ,१० हजार रुपये, किंमतीची एक सोन्याची अंगठी , ३० हजार रुपये किंमतीचे एक सोन्याचे कानातील टॅप्स, २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मनी मंगळसुत्र यासह इतर दागिने असा एकुण 2 लाख 62 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, शहरचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीसांनी हि कामगिरी बजावली आहे.