बारामती, ऊसदराची स्पर्धा संपल्याने सोमेश्वरचं फावलं
कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली असताना सोमेश्वर ने टनाला ४00 रू कमी दिलेले आहे कारखान्याने ३४00 रू भाव देणे अपेक्षित होते, परंतु स्पर्धाच न राहील्यामुळे आता सभासदांना येथून पुढे कमीच दर घ्यावा लागणार आहे.
सोमेश्वर ने दिवाळीसाठी १०० रुपये बिल देऊन सभासदांची थट्टा केली असल्याचा आरोप सोमेश्वर चे माजी संचालक पी. के. जगताप यांनी केला आहे. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, श्री सोमेश्वर सह साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रात पावसाळी हंगामात अतिवृष्टी व लॉकडाऊन झाल्यामुळे तरकारी व इतर कोणत्याही पिकाचे उत्पन्न न मिळाल्यामुळे कारखाना सभासद आर्थिक अडचणीत आला आहे . अशा परिस्थितीत कारखान्याने जाहीर केलेला बाजारभाव अतिशय असमाधानकारक आहे.
या पंचवार्षिक मध्ये सभासदांना ३ वर्ष फक्त FRP वरच थांबल्नेले होते, मागील वर्षी माळेगाव विरोधकांच्या ताब्यात असल्यामुळे सोमेश्वरने ३३00 रू भाव दिला त्या वेळी विद्यमान चेअरमन यांनी घोषणा केली होती की, पुढील वर्षी ३३00 रू. पेक्षा जास्त भाव देऊ प्रत्यक्षात मात्र तो कमीच दिला आहे. मागील वर्षी पेक्षा ३00 रू कमी दिले आहेत, कारखान्याकडे आज २० कोटी चढउतार निधी शिल्लक असताना व केंद्राने साखरेचा भाव ३१00 रू केलेला असता सभासदांना किमान मधुन २00 रू विज विकी +डिस्टीलरी आणि चढउतार निधीतुन २00 असे प्रतिटन ४00 रू देता येत आहेत असे असताना माळेगाव व सोमेश्वर एकाच नेतृत्वाखाली काम करत असल्याने सभासद अडचणीत असताना व भाव बसत असताना ४00 रू कमी दिलेले आहे कारखान्याने ३४00 रू भाव देणे अपेक्षित होत परंतु स्पर्धाच न राहील्यामुळे सभासदांच्या तोंडाला पाने पुसली आहेत सोमेश्वर कारखान्याची निवडणुक दोन महिन्यांवर आली असताना कमी भाव दिला आहे आणि नंतरची पाच वर्ष कमीच भाव मिळणार आहे . कारखाना ही २८००० सभासदांच्या मालकिचा आहे, त्यांचे हित पाहणे संचालक मंडळाचे काम आहे, ही त्यांची जबाबदारी आहे . अंतिम भावा वरती कार्यक्षेत्रातील सभासदांमध्ये असंतोष आहे. सभासदांना स्पर्धात्मक दर हवा असल्यास सोमेश्वर आणि छत्रपती मध्ये सत्तांतर घडवण्याची संधी शेतकऱ्यांना आहे असे मत पी. के . जगताप माजी सभापती मार्केट कॉगटी पुणेचे दिलीप खैरे विठ्ठलराव पिसाळ सर, बाळासाहेब जगताप
अशोकराव खलाटे यांनी व्यक्त केले आहे.