
इंदापुरात किल्ला बांधणी स्पर्धेस उत्फुर्त प्रतिसाद
इंदापूर - (प्रतिनिधी) इंदापूर शहरात नुकत्याच पार पडलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेस उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. हि स्पर्धा नगरसेवक श्री.अनिकेत अरविंद वाघ व राधिका सेवा संस्था इंदापूर यांच्या वतीने इंदापूर शहराकरीता आयोजित करण्यात आली होती. यावेळी या स्पर्धेत इंदापूर शहरातून मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.
किल्ले पाहणी करतेवेळी किल्ल्याची बांधणी व प्रकार, किल्ल्यावर असणारे बुरूज व तटबंदीची बांधणी, किल्यावरील ठिकाणांचा नाम फलक आणि त्या किल्ल्यवरील एखादी ऐतिहासिक घटना किंवा त्यास लाभलेला ऐतिहासिक वारसा या सर्व बाबींचा विचार करून या स्पर्धेचे प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले.
प्रथम येणाऱ्या तीन क्रमांकाचा रोख रक्कम,प्रमाणपत्र, व पारितोषिक देऊन बक्षीस वितरण देखील दिनांक. १८/११/२०२० रोजी पार पडले व तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
वृंदावन ग्रुप (प्रथम क्रमांक), अथर्व मनोज परदेशी (द्वितीय क्रमांक), रूद्र अभिजित पाटील (तृतीय क्रमांक) अशा प्रकारे या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकाच्या यादीत या स्पर्धकांनी बाजी मारली.
या स्पर्धचे परिक्षण सन्मानिय परिक्षक वाघमोडे सर यांनी केले.
यावेळी नगरसेवक श्री.अनिकेत अरविंद वाघ, श्रीकांत मखरे,उमेश मखरे,किरण कणसे,निखील बंगाळे,सुरज बंगाळे,नीरज खानेवाले व इतर मान्यवर उपस्थित होते.