
सोमेश्वरनगर : कराटे ब्लॅक बेल्ट स्पर्धेत प्रणव भांडवलकर प्रथम
Friday, November 20, 2020
Edit
सोमेश्वर नगर : वाणेवाडी (ता बारामती) येथील जुडो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट्स असोसिएशन तर्फे नुकत्यात आयोजित केलेल्या कराटे स्पर्धेत प्रणव भांडवलकर हा ब्लॅक बेल्ट चा मानकरी ठरला वानेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, करंजेपुल येथील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत तर्फे तीन दिवसाचे कराटे व योगा व प्रणायम जुदो कराटे बॉक्सिंग फाईट नाईन चोप लाटी काठी काता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कालावधीत विविध मान्यवरांच्या व्याख्यांमला व्याख्यानाचेही आयोजन केले होते कॅम्पचे उद्घाटन वानेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ कराडे सर यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी मा. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष विक्रम भोसले त्रिमूर्ती दूध संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सावंत कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले अशोक भोसले दुष्यांत चव्हाण उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे
येलो बेल्ट - विश्वजीत आगवणे
ऑरेंज बेल्ट - समृद्धी कोकरे रुद्र कोकरे
ग्रीन बेल्ट - वैष्णवी जाधव, तन्मय बामणे, अथर्व बुनगे, प्रणव गायकवाड, जयदीप जाधव
ब्ल्यू बेल्ट - शोनक महानवर, ओजस निगडे, मेघराज भिसे
पर्पल बेल्ट सेकंड - पल्लवी जगताप
ब्लॅक बेल्ट प्रणव भांडवलकर, सोहम दिवेकर, अजित कराडे, संस्थेचे चिप मास्टर धनंजय भोसले यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
संस्थेचे ग्रँड मास्टर प्रकाश रासकर, ब्लॅक ब्लॅक मास्टर यशराज जगताप, निखिल सूर्यवंशी, समृद्धी ननवरे,
ऋचा कदम, हर्षवर्धन जगदाळे, प्रथमेश गायकवाड, पृथ्वीराज परकाळे, शुभम कांबळे, प्रवीण वैरागे, वैभव सोनवणे, यश दीक्षित यांनी मार्गदर्शन केले.