
शरद गुळुंबे कुटुंबीयांना सोमेश्वरक्लबच्या सदस्यांची ६१ हजाराची मदत
Sunday, November 22, 2020
Edit
सोमेश्वरनगर ( प्रतिनिधी ) - आपला सहकारी नियमीत ट्रेक मधे सहभागी असणारा आपला एक सहकारी मित्र शरद गुळुंबे याचे अपघाती व अवेळी निधन झाल्याने त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी आपण मदत करावी याहेतुने सोमेश्वर क्लब चे सदस्य एकत्र आले व त्यानी ५० हजार रु गोळा केले तसेच अक्षय शिंदे फौंडेशन,वाघळवाडी चे संचालक संजय शिंदे यानी देखील अकरा हजार रुपये मदतीचा चेक गुळुंबे कुटुंबीयाना दिला .
पुणे जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रमोदकाका काकडे, सोमेश्वर कारखाना माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे ई मान्यवरांच्या हस्ते चेक व रोख रक्कम देण्यात आली .
प्रास्ताविक ॲड .गणेश आळंदीकर यानी करुन सोमेश्वर क्लब च्या कार्याचा आढावा घेतला. वाघळवाडी चे माजी सरपंच सतीश सकुंडे यानी कै शरद गुळुंबे यांच्या पत्नीला त्यांचे शिक्षण व गुणवत्ता उत्तम असल्याने जिल्हा परिषद आंगणवाडी साठी बाल कल्याण समितीद्वारे त्याना नोकरी द्यावी अशी विनंती क्लब तर्फे प्रमोद काका काकडे याना केली . श्री प्रमोद काका काकडे यानी करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड यानी गुळुंबे ताईच्या नोकरीचा प्रस्ताव द्यावा आपण जातीने त्याबाबत प्रयत्न करु व मुलीच्या शिक्षणासाठी मदत करु असे सांगीतले.यावेळी सोमेश्वर क्लब चे सदस्य परवेझ मुलाणी ,केशव जाधव ,प्रमोद काकडे ,संतोष सोरटे ,हेमंत पवार ,फत्तेसिंग चव्हाण,कृणाल गायकवाड ,संजय शिंदे ई मान्यवरासह सर्व सदस्य हजर होते.
धनंजय गायकवाड यानी आभार मानले.