-->
बारामती तालुका मराठी पत्रकार संघ व आचार्य अकॅडमीच्या वतीने बारामती टॅलेंट सर्च एक्झाम

बारामती तालुका मराठी पत्रकार संघ व आचार्य अकॅडमीच्या वतीने बारामती टॅलेंट सर्च एक्झाम

बारामती - प्रतिनिधी
माजी कृषिमंत्री पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका मराठी पत्रकार संघ व आचार्य अकॅडमी बारामती यांच्या वतीने ऑनलाइन बारामती ॲण्ड सर्च एक्झाम या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
   पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित बारामती तालुका मराठी पत्रकार संघ व आचार्य अकॅडमी बारामती च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा बारामती तालुक्यातील विविध शाळातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार असून स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस रुपये पाच हजार रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय बक्षीस रुपये तीन हजार रोख व सन्मानचिन्ह, तृतीय बक्षीस दोन हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह,चतुर्थ बक्षीस एक हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह तसेच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक शाळेला सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेत इंग्रजी गणित व विज्ञान या विषयावरती बहुपर्यायी प्रश्न असून 60 प्रश्नांपैकी 50 प्रश्न सोडवायचे असून प्रत्येक प्रश्न दोन गुंडांना असेल एक डिसेंबर रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी या ऑनलाईन स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी उपाध्यक्ष प्रशांत व आचार्य अकॅडमी चे प्रमुख ज्ञानेश्वर मुटकुळे व मनोज वाबळे सर यांनी केले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article