-->
धक्कादायक! बारामतीत सव्वा महिन्याच्या बालिकेला बुडवून मारले

धक्कादायक! बारामतीत सव्वा महिन्याच्या बालिकेला बुडवून मारले

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव येथील सव्वा महिन्याच्या बालिकेचा पाणी साठविण्याच्या टाकीत बुडवुन खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २५ ) दुपारी २.३० घडली. या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


          दिपाली संदीप झगडे (रा. काटेवाडी, ता. बारामती) येथील विवाहिता बाळंतपणासाठी तिच्या माहेरी माळेगाव येथे आली होती. माळेगाव परिसरातील चंदननगर येथे तिचे वडील संजय जाधव वास्तव्यास आहेत. संगीता यांनी या बालिकेला पाळण्यात झोपविले होते. मात्र पाळण्यातून ती बेपत्ता झाली. परिसरात तिचा शोध घेऊन देखील ती न सापडल्याने संदिप जाधव यांनी माळेगाव पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्या बालिकेचा मृतदेह जाधव कुटुंबियांच्याच पाणी साठविण्याच्या ५०० लीटरच्या टाकीत सापडला. घरापासुन ४० फुट अंतरावर ही टाकी आहे. याच टाकीत बालिकेचा मृतदेह फुगल्याने वर आला होता. तसेच या टाकीचे झाकण बंद असल्याची माहिती मिळत आहे.
 
          दिपाली यांना यापूर्वी ६ वर्ष, ३ वर्ष वयाच्या दोन मुली आहेत. आज मृत्युमुखी पडलेले बालिका हे त्यांचे तिसरे अपत्य आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालिकेचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस निरीक्षक महेश ढवाण,सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी  कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दिपालीसह जाधव कुटुंबियांकडे याबाबत कसून चौकशी सुरु आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article