
सोनकसवाडीत ऊसासह ठिबक सिंचन खाक
Sunday, November 29, 2020
Edit
पणदरे - बारामती तालुक्यातील सोनकसवाडी येथील रणजित दशरथ कोकरे यांच्या तुटणाऱ्या ऊसाला लागलेल्या आकस्मित आगीत ऊसासह ठिबक संच जळून खाक झाला.
शुक्रवार दिनांक 27 रोजी 12 च्या दरम्यान ऊसाने अचानक पेट घेतला. आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यात यश न आल्याने आगीत गट नं.92 तुटून जाणारा 265 जातीचा 3 एकर ऊस व ठिबक संच जळाले. तसेच त्यांच्या शेजारी गट नं 97 मधील सत्यजित संभाजी जगताप यांच्या तुटून गेलेल्या ऊसातील ठिबक संच जळून गेला. गावकामगार तलाठी व पोलीस दुरक्षेत्र पणदरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पंचनामा केला असता रणजित कोकरे यांचे ऊसाचे 3 लाख तर ठिबक सिंचनाचे 1.50 लाख तर सत्यजित जगताप यांच्या ठिबक सिंचनाचे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अधिकृत पंचनामा केला आहे.
तरी शासनाने जळीत उसाची नुकसान भरपाई व विमा कंपनीने जळीत ठिबक सिंचनाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी उपसरपंच सत्यजित जगतात यांनी केली आहे.