
बारामती : पोलिसांवर गोळीबार करणाऱ्यातील एकाला अटक तर दोघेजण फरार
Monday, November 30, 2020
Edit
वडगांव निंबाळकर - राजगड पोलीस स्टेशन हद्यीत पोलीसांचे वेशात येवून सराफाचे दुकान गोळीबार करत लुटणारे व वडगाव निंबाळकर पो.स्टे.चे हद्यीत सराफ दुकानदाराला लुटणारे टोळीतील आरोपीचा सुगावा लागलेने त्यांचा पाठलाग करताना फलटण जवळ वडले गावात सहा पोलीस निरीक्षक श्री.लांडे वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकाने एका दरोडेखोराला ( प्रविण प्रल्हाद राऊत रा.चिखली ) याला ताब्यात घेतले असुन दोन दरोडेखोर ( पप्पु उर्फ सुहास सोनवलकर रा.वडले ता.फलटण व प्रमोद ऊर्फ आप्पा ज्ञानदेव माने रा.तामशेतवाडी ता.माळशिरस जि.सोलापुर ) पोलीसांचे दिशेने गोळीबार करुन ऊसाचे शेतात पसार झाले आहेत.यामध्ये सर्व पोलीस पथक सुखरुप असुन कोणलाही इजा झलेली नाही.
फरार आरोपीचा शोध पुणे ग्रामीण व फलटण पोलीस हे करीत आहेत.
सदरबाबत अमोल निवृती भुजबळ वय ३१ वर्ष व्यवसाय नोकरी पोलीस कॉन्स्टेबल नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण रा.वाल्हे ता.पुरंदर जि.पुणे यांनी दिले फिर्यादीवरुन फलटण ग्रामीण ला भादविसं कलम ३०७,३५३,३४ आर्म एक्ट ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करनेत आला आहे.
घटनास्थळी मा.धिरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा पोलीस मा.श्री.तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी गुन्हयाचे ठिकाणी भेट देवून तपास कामी सुचना दिल्या.