
सोमेश्वरनगरला जिल्हापरिषदेचे गेस्ट हाऊस सुरू करण्याची मागणी
Thursday, November 19, 2020
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे पुणे जिल्हा परिषदेचे गेस्ट हाऊस सुरू करण्याची मागणी पुणे जिल्हा रेशन कार्डधारक संघटनेचे अध्यक्ष राजेश वाघ, सचिव रामभाऊ तावरे यांनी केली आहे.
मिनी मंत्रालय म्हणून पुणे जिल्हा परिषदेकडे पहिले जाते. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून बांधकाम सभापती प्रमोद काकडे सोमेश्वर नगर जवळील निंबुत गावचे आहेत.
सोमेश्वरनगरला जिल्ह्यात नंबर 1 चा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, इंजीनियरिंग कॉलेज, आश्रम शाळा, महाविद्यालय, हायस्कूल आहे. तसेच राज्यात प्रसिद्ध असलेले सोमेश्वर देवस्थान करंजे येथे असल्याने राज्यातून परराज्यातून देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व विविध कामांसाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची ये-जा असते.
फ्रेश होण्यासाठी किंवा रात्रीचा मुक्काम करण्याची वेळ आल्यावर बारामती शहरा शिवाय पर्याय नसतो. यात मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा जातो जिल्हा परिषदेचे लोणावळा जेजुरी येथे गेस्ट हाऊस आहे. तसे सोमेश्वर नगर परिसरात सुरू केल्यास त्याचा फायदा सोमेश्वर व मोरगाव येथे येणाऱ्या भाविकांना, अधिकारी, पदाधिकारी यांना होणार आहे.
तरी बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी गेस्टहाऊस सुरू होणे कामी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी पुणे जिल्हा रेशन कार्ड संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.