-->
माळेगाव : तिसरीही मुलगीच झाली! जन्मदात्या आईकडूनच कोवळ्या जीवाची हत्या

माळेगाव : तिसरीही मुलगीच झाली! जन्मदात्या आईकडूनच कोवळ्या जीवाची हत्या

बारामती : समाजात अजूनही मुलगा-मुलगी असा भेद केला जात असल्याचं चित्र आहे. तिसरीही मुलगीच झाली म्हणून जन्मदात्या आईनंच आपल्या कोवळ्या जीवाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगावच्या रामनगरमध्ये घडली आहे.
         25 तारखेला दुपारी सव्वा महिन्याच्या मुलीला पाळण्यात झोपवून आई झोपी गेली. आई उठल्यावर उठल्यावर बाळ पाळण्यात नव्हते. अधिक शोधा शोध केली असता ते घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आले. त्यानंतर त्या बाळाला दवाखान्यात नेलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर कुटुंबीयानं या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून केली होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता हे कृत्य आईनेच केलं असल्याचं उघड झालं आहे.
          सव्वा महिन्याची बाळ दुपारी झोपल्यानंतर आईनं बाळाला घराजवळील पाण्याच्या टाकीत टाकलं. बाळ रडल्याचा आवाज येऊ नये म्हणून टाकीचे झाकण लावलं होतं. काही क्षणातचं कोवळ्या जीवानं प्राण सोडला, अशी माहिती आरोपी आईनं पोलिसांनी दिली.
        दीपाली झगडे असं महिलेचं नाव आहे. तिनं पोलिसांना सांगितलं की, या याआधी दीपालीला 2 मुली झाल्या होत्या. तिला तिसरा मुलगा हवा होता. पण तिसरीही मुलगीच झाली. त्याच रागातून माहेरी आलेल्या दीपालीने सव्वा महिन्याच्या मुलीची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली. माळेगाव पोलिसांनी दीपाली झगडेला अटक केली आहे. तिच्याविरुद्ध भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article