
शिक्षक, पदवीधर निवडणूक आचारसंहितेचे पालन करा - प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे
Friday, November 20, 2020
Edit
बारामती - शिक्षक, पदवीधर निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन बारामती उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
पुणे विभागातील शिक्षक, पदवीधर मतदार संघात निवडणुकीसाठी दिनांक 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे व 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
पुणे विभाग मतदारसंघात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून शिक्षक मतदारसंघातून 35 तर पदवीधर मतदारसंघात 78 वैध अर्जांपैकी 16 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 62 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
सदर निवडणुकीत राजकीय व अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतल्याने निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक लक्ष ठेवून आहेत. तसेच बारामती उपविभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. जर कोणी आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे प्रांताधिकारी कांबळे यांनी साप्ताहिक निरा-बारामती वार्ता वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
पदवीधर मतदार संघ जिल्हानिहाय मतदार
पुणे - 1 लाख 36 हजार 611
कोल्हापूर - 89 हजार 529
सांगली - 87 हजार 233
सातारा - 59 हजार 71
सोलापूर - 52 हजार 745
शिक्षक मतदार संघ जिल्हानिहाय मतदार
पुणे - 32 हजार 201
सोलापूर - 13 हजार 12,
कोल्हापूर - 12 हजार 237
सातारा - 7 हजार 711
सांगली - 6 हजार 812