शेतकरी संघटनेचे नेते अशोक खलाटे यांना मातृश्लोक
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील माळवाडी लाटे येथील श्रीमती हिराबाई माधवराव खलाटे यांचे बुधवार दिनांक 4 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती स्वर्गीय माधवराव खलाटे यांनी स्थापन केलेल्या भैरवनाथ विकास सोसायटीच्या पंचवीस वर्षे संचालिका, ग्रामपंचायत सदस्या म्हणून त्यांनी काम पाहिले व सर्वोत्कृष्ट गृहिणी म्हणून त्यांची ओळख होती. अंत्यविधी प्रसंगी दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, भगत आबा जगताप, सोमेश्वर चे संचालक सचिन खलाटे, नानासो खलाटे, अशोक मुळीक, विलास भगत उपस्थित होते. खलाटे यांच्या पाश्चात्य 3 विवाहित मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बारामती तालुका शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष व सरपंच अशोक खलाटे यांच्या त्या मातोश्री होत.
उद्या दि.६ रोजी लाटे येथे सावडण्याचा विधी होईल.