-->
बारामती; प्रशासकीय भवनासमोर शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

बारामती; प्रशासकीय भवनासमोर शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

बारामती - आज संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने बारामती येथे प्रशासकीय भवना समोर शेतकरी विरोधी कृषी विधेयक कायदे रद्द करावे व दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही थांबवावी या मागणीसाठी दगड रूपी केंद्र सरकारला पुष्पहार घालून आंदोलन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी मा.दादासो कांबळे यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.

      निवेदनामध्ये म्हटले आहे की, शेतीमाल विक्री कायदा 2020 बऱ्याच कालावधीपासुन शेतकरी त्यांच्या मालाला आधारभुत किंमत मिळावी म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करा म्हणत असताना शेतीमाल विक्री कायदा लागु करून कृषी उत्पन्न बाजार समीतीचे खच्चीकरण करूण भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याचा घाट घातला आहे त्यामुळे तो थांबविण्यात यावा व शेतकरी विरोधी शेतीमाल विक्री कायदा 2020, कंञाटी शेती कायदा 2020, अत्यावश्यक वस्तु कायदा हे कायदे रद्द करावे, स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही तात्काळ थांबवावी, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व आगामी काळात प्रस्तावित असलेले शेतकरी विजबिल विधेयक पुढे रेटणे थांबवावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
         याप्रसंगी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत पवार, जिल्हा सचिव विनोद जगताप, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल काळकुटे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, उपाध्यक्ष योगेश जगताप, इंदापूर तालुका अध्यक्ष मकरंद जगताप, बारामती तालुका सचिव सोमनाथ जाधव, कार्याध्यक्ष मयुर जाधव, इंदापूर तालुका सचिव शुभम चव्हाण, भवानीनगर अध्यक्ष बबन पवार, उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड बारामती तालुका उद्योजक कक्ष अजित चव्हाण, दत्तात्रय जाधव, राहुल मोरे, सोमनाथ भोसले, अभिजीत जाधव इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article