
काटेवाडी, गडांगणाचे औचित्य साधून नवरदेवाला मास्क सॅनिटायझर व वाफेचे मशीन भेट
Thursday, December 10, 2020
Edit
काटेवाडी - भारतीय संस्कृतीमध्ये नवरदेवाला टॉवेल टोपी किंवा संपूर्ण पोशाख दिले जातात, सध्या कोरोना सारख्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्स चे नियम पाळून काटेवाडी गावामध्ये काळे परिवाराच्या वतीने धनंजय काळे यांनी त्यांचे मित्र भूषण टकले यांना गडांगणाचे औचित्य साधून मास्क सॅनिटायझर व वाफेचे मशीन भेट दिले आहे. भूषण टकले यांचा विवाह इंदापूर तालुक्यातील शहा गावांमधील राजश्री अर्जुन पांढरे हीच्याशी 23 डिसेंबरला आहे त्याचे औचित्य साधून गडंगण केले होते.
यावेळी दिपाली काळे व धनंजय काळे सह आशीर्वाद मच्छी ढाब्याचे मालक पप्पू राऊत संदीप दळवी सर चंद्रकांत काळे चंद्रकांत पवार सतीश ठोंबरे व गोटू गावडे उपस्थित होते.