
राज्यात रक्ताचा तुटवडा, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करा - संभाजी होळकर
Saturday, December 12, 2020
Edit
कोऱ्हाळे बु- देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विकास पर्व रोहीत दादा पवार प्रतिष्ठान बारामती व कृष्णाई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोरख बाप्पू पिंगळे, (अध्यक्ष विकास पर्व रोहितदादा पवार प्रतिष्ठान) मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर पार पडले.
रक्तदान शिबिराचे उदघाटन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर यांच्या हस्ते झाले. बारामती तालुक्यात पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
यावेळी बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप पाटील जगताप, सो. स. सा. कारखान्याचे माजी व्हा चेअरमन सुनिल तात्या भगत, विकास पर्व रोहीत दादा पवार प्रतिष्ठान उपाध्यक्ष गणेश साकोरे, मार्केट कमिटीचे सभापती अनिल खलाटे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव टेंगले, योगेश भैया जगताप, संचालक मा. स. सा कारखाना
स्वप्नील अण्णा जगताप, सचिन बाबा खलाटे संचालक सो कारखाना व सागर देवकाते त्याच प्रमाणे शिरष्ने, कुरणेवाडी, पिंगळेवस्ती, माळवाडी, लाटे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश पिंगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रवीण काळभोर (रोहीत दादा प्रतिष्ठानचे बारामती तालुका संपर्क प्रमुख) यांनी मानले