
ढाकाळे, पैशाच्या वादावरून एकावर तलवार व चाकूने हल्ला
Thursday, December 10, 2020
Edit
वडगांव निंबाळकर - तू माझ्यावर कोर्टात केस केली आहे, मी पैसे देणार नाही तसेच इथून पुढे बकऱ्याचे पैसे मागायचे नाहीत अशी दमबाजी करत चौघांनी एका जनाला चाकू आणि तलवारीने मारहाण केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्ञानदेव राजाराम शिर्के रा ढाकाळे ता बारामती यांनी फिर्यात दाखल केली आहे.
यावरून पोलिसांनी गणेश मल्हारी चव्हाण, उमेश मल्हारी चव्हाण शशिकला मल्हारी चव्हाण व एक अनोळखी इसम नाव पत्ता माहित नाही सर्व रा ढाकाळे ता.बारामती,जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सकाळी १० वाजता ढाकाळे गावचे एस.टी स्टॅडवर असताना आरोपी गणेश चव्हाण हा फिर्यादीचे जवळ आला व फिर्यादीला म्हणाला की तु माझे विरुध्द कोर्टात केस केली आहे मी तुला पैसे देणार नाही. असे म्हणुन त्याने फिर्यादीला शिवीगाळ व हाताने मारहाण केली त्यावेळी फिर्यादीने त्यास म्हणालो मला मारहाण करू नको असे म्हणालेवर तो निघुन गेला त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता फिर्यादी ढाकाळे ता बारामती गावचे हद्दीत येळे सरांचे सिमेंट पाईप कंपनीजवळ रोडवर फिर्यादीचे घऱी जात असताना आरोपी गणेश मल्हारी चव्हाण हा त्याचे हातात चाकु घेवुन आरोपी नं 2)उमेश मल्हारी चव्हाण हा त्याचे हातात लोखंडी गज आरोपी नं 3) शशिकला मल्हारी चव्हाण ही तिचे हातात काठी घेवुन सर्व रा ढाकाळे ता.बारामती,जि.पुणे व एक अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही )हातात लोखंडी तलवार होती.
त्यावेळी आरोपी नं १ हा म्हणाला कि तु मला यापुढे तुझ्या बक-याचे पैसे मागायचे नाहीत असे म्हणुन फिर्यादीला जिवे मारू टाकु असे म्हणुन आरोपीने फिर्यादीचे उजव्या कानावर चाकुने वार केला त्यावेळी आरोपी नं 2 याने त्याचे हातातील लोखंडी गजाने फिर्यादीचे डोकीत मारुन जखमी केले त्यावेळी फिर्यादी ओरडु लागलो असता आरोपी नं 3 हिने पाठीत मारहाण केली त्यावेळी फिर्यादी त्यांचे तावडीतुन पळुन जात असताना अनोळखी इसमाचे हातुन तलवार घेवुन याला आता जिवंत सोडु नका असे म्हणुन फिर्यादीला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने तलवार डोकीत मारली ती तलवार फिर्यादीने हुकवली असता तिचा वार फिर्यादीचे नाकावर बसुन नाकाला गंभीर जखम होवुन त्यातुन रक्त वाहु लागले त्यावेळी जमीनीवर खाली पडलो त्यावेळी फिर्यादीला खाली पडलेले पाहुन ते सर्वजण तेथुन निघुन गेले.
गुन्हयाचा तपास पोसई कवितके करीत आहेत.