-->
नियमांचे पालन न केल्याने दुकानमालकांना वडगांव निंबाळकर पोलिसांचा झटका, कोरोनाचे नियम मोडल्याने 5 दुकानदारांवर गुन्हे दाखल

नियमांचे पालन न केल्याने दुकानमालकांना वडगांव निंबाळकर पोलिसांचा झटका, कोरोनाचे नियम मोडल्याने 5 दुकानदारांवर गुन्हे दाखल

कोऱ्हाळे बु|| -  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.योगेश शेलार, पोलीस अंमलदार पो.ना / कुलकर्णी, पो.कॉ.गौतम लोकरे, महादेव साळुके, ज्ञानेश्वर सानप, अमोल भुजबळ यांचे पथकाने १) अर्जुन रामभाऊ घाडगे व्यवसाय - घाडगे मोटार रिवायडींग दुकान, सोमेश्वरनगर वाधळवाडी रा.वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे २ ) लालुसिंग रतनसिंग राजपुरोहीत व्यवसाय - महाराणी स्वीट्स दुकान, करंजेपुल रा.वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे ३) रोहीत सुनिल घोडके व्यवसाय- प्रकाश चिकन शॉप, वडगाव निंबाळकर रा.वडगाव नि.ता.बारामती जि.पुणे ४) हनुमंत विठठल लोणकर व्यवसाय साईराज जनरल स्टोअर्स / पानटपरी होळ चौक, रा.वडगाव नि.ता.बारामती जि.पुणे ५) जयेश जीवन गायकवाड व्यवसाय - सुमोहन जनरल स्टोअर्स / उमाजी नाईक चौक, रा.वडगाव नि.ता.बारामती जि.पुणे ठिकाणी अचानक भेटी देवुन पडताळणी केली केली असता मा.अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा मा. जिल्हाधिकारी सो पुणे यांचे आदेशानुसार सर्व नागरीकांनी मास्कचा वापर करणेबाबत आदेश असताना देखील कोरोना सारख्या आजारापासुन बचाव होणेकरीता स्वत:चे तोंडाला मास्क न लावता यांनी स्वत:चे आस्थापना / दुकान / पानटपरी ठिकाणी कोणतेही समाधानकारक कारण नसताना लोकांची गर्दी करुन स्वतः मास्कचा वापर न करता मानवी जिवीतास व वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण होईल, याची जाणीव असताना देखील मा.जिल्हाधिकारी सो.पुणे यांचे वरील आदेशाचा अवमान करीत असताना मिळुन आलेने  यांचे विरुद्ध महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथ अधिनियम १८९७ सह भा.द.वि. १८८,२६९, २७० प्रमाणे गुन्हा दाखल केलेले आहेत . या व्यतिरीक्त काल दिनांक १७/०३/२०२१ रोजी मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांनी कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा याकरीता नागरीकांनी मास्कचा वापर करणे संदर्भात वेळोवेळी आदेश दिलेले असताना देखील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हदद्दीत विनामास्क सार्वजानिक ठिकाणी वावरणान्या ५५ नागरीकांकडुन प्रत्येकी ५०० रुपयेयाप्रमाणे २७,५०० रुपये दंड आकारण्यात आलेला आहे . यापुढील कालावधीत देखील भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथ अधिनियम १८९७ अन्वये वेळोवेळी पारीत केलेले आदेश , निर्देश , SOP चे इ.चे प्रभावी अंमलबजावणी करणेचे अनुषंगाने विविध आस्थापना , राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ- वाढदिवस, इ. कार्यक्रमांचे ठिकाणी तसेच हॉटेल व इतर आस्थापनांचे ठिकाणी अचानक भेटी देवुन नियमांचे उल्लंघन करणारे नागरीक यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेत येईल असे वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशनचे एपीआय श्री.सोमनाथ लांडे यांनी सांगितले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article