-->
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वसंत गावडे तर उपसभापतीपदी दत्तात्रय सणस

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वसंत गावडे तर उपसभापतीपदी दत्तात्रय सणस

        बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार सॊ यांचे आदेशानुसार सभापती पदी पारवडी गावाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झुंजार कार्यकर्ते श्री.वसंत बाबुराव गावडे व उपसभापतीपदी सोनकसवाडी गावाचे जेष्ठनेते श्री.दत्तात्रय गणपत सणस यांची निवडीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर यांनी केली. सदरची निवडणूक ही बिनविरोध होऊन सर्वांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या...!
        यावेळी मावळते सभापती श्री.अनिल खलाटे, उपसभापती श्री.बाळासाहेब पोमाणे, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन श्री.संदीप जगताप, पंचायत समितीचे प्रभारी सभापती श्री.प्रदीप धापटे, पंचायत समिती मा.सभापती सौ.निताताई बारवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री.अरविंद जगताप, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.महावीरशेठ वडूजकर, निवडणूक निर्णय अधिकारी मा.कुंभार साहेब तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article