
सार्वजनिक ठिकाणी अचानक भेटी देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांवर कायदेशीर कारवाई करणार - एपीआय सोमनाथ लांडे
Sunday, March 14, 2021
Edit
कोऱ्हाळे बु|| - आज दिनांक १४/०३/२०२१ रोजी मा.जिल्हाधिकारी सो.पुणे यांनी कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा याकरीता नागरीकांनी मास्कचा वापर करणे संदर्भात वेळोवेळी आदेश दिलेले असताना देखील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हदद्दीत विनामास्क सार्वजानिक ठिकाणी वावरणाऱ्या ३५ नागरीकांकडुन प्रत्येकी ५०० रुपयेयाप्रमाणे १७,५०० रुपये दंड आकारण्यात आलेला असुन यापुढील कालावधीत देखील भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथ अधिनियम १८९७ अन्वये वेळोवेळी पारीत केलेले आदेश निर्देश, SOP चे इ.चे प्रभावी अंमलबजावणी करणेचे अनुषंगाने विविध आस्थापना, राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ- वाढदिवस, इ. कार्यक्रमांचे ठिकाणी तसेच हॉटेल व इतर आस्थापनांचे ठिकाणी अचानक भेटी देवुन नियमांचे उल्लंघन करणारे नागरीक यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करणेत येईल असे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे एपीआय सोमनाथ लांडे यांनी सांगितले.