
जगतापवस्ती - खताळवस्ती रस्त्याने दहा वर्षानंतर घेतला मोकळा श्वास
Thursday, March 18, 2021
Edit
मोरगांव : बारामती तालुक्यातील तरडोली येथील जगतापवस्ती - खताळ्वस्ती या रस्त्याने तब्बल दहा वर्षानंतर मोकळा श्वास घेतला आहे. येथील ग्रामस्थांना दिड किलोमीटर अंतर काटेरी झुडपातुन वाट काढत पार करावे लागत होते. मात्र युवा सरपंच नवनाथ जगदाळे यांच्या पुढाकाराने ही झुडपे काढून रस्ता मोकळा केला आहे.
तरडोली येथील खताळवस्ती व जगतापमळा या वस्त्या तब्बल ३५० लोकसंख्येच्या आहेत. या वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला तब्बल दिड किलोमीटरची काटेरी झुडपे होती . ही झुडपे रस्त्यावर पांगली असल्याने येथील ग्रामस्थांच्या जणु पाचवीलाच काटेरी झुडपे पूजली होती . तब्बल पंधरा फुट असलेल्या रस्त्यापैकी केवळ तीन फुट रस्ता काटेरी बाभळीमुळे शिल्लक राहीला होता. या काटेरी झुडपातुन वाट काढत शाळेतील मुल, शेतकरी, कष्टकरी, व ग्रामस्थांना जावे लागत होते.
तब्बल दहावर्षे येथील ग्रामस्थांकडून वेळोवेळी मागणी करूनही ग्रामपंचायतीकडे उपलब्ध निधी, वेळकाढूपणामुळे मागणी जैसे थे अवस्थेत होती. मात्र येथील युवा सरपंच नवनाथ जगदाळे यांकडे येथील ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर बाकी कामे बाजुला सारून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. सस्त्याच्या बाजुला असलेली दिड किमी अंतरावरील झुडपे काढली आहेत . यामुळे एक नव्हे तर तब्बल दहा वर्षानंतर येथील ग्रामस्थांनी व रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.