-->
राज्य उत्पादन शुल्क,जी विभाग पुणे यांच्या कारवाईत गोवामद्याचा साठा हस्तगत

राज्य उत्पादन शुल्क,जी विभाग पुणे यांच्या कारवाईत गोवामद्याचा साठा हस्तगत

मोरगांव :    राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाने दौंड तालुक्यातील कानगाव येथे गोवा राज्यात विक्रीस  असलेल्या  दारूची  अवैध वाहतूक करताना रंगेहात पकडलेले आहे . सुमारे अडीच लाख रुपयांची हा  मुद्देमाल ताब्यात घेतला  असून शासनाची  मोठी महसूल हाणी टळली आहे .उत्पादन शुल्काच्या जी विभागाच्या युनीट दोनने ही कारवाई केली .

        दौंड तालुक्यातील कानगाव  रस्त्यावरून  गोवा राज्यात विक्रीस असलेल्या दारुची  अवैध वाहतूक होणार  असल्याची खात्रीलायक  माहिती राज्य उत्पादन शुल्कास समजली .  सदरची कारवाईची आखणी  आयुक्त कांतीलाल उमाप , संचालक (अ.व द.) सुनील चव्हाण तसेच पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त  प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष  झगडे तसेच उपअधीक्षक, संजय जाधव व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. कान्हेकर, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग बीट क्र. २ पुणे यांनी केली.  


या  कारवाईत  बी.व्ही. ढवळे निरीक्षक,  विकास थोरात, सतीश काळभोर, दुय्यम निरीक्षक, तसेच सर्वश्री जवान  चंद्रकांत इंगळे,मोहन गवळी,सोहन मालुसरे, नवनाथ पडवळ, वाहनचालक, प्रमोद खरसडे यांनी  सापळा लावला होता . मिळालेल्या मागीतीनुसार कानगांव –हातवळण रस्त्यावर , प्राथमिक शाळेजवळ संशयीत कार क्र. एमएच  १७   ए.जी ५७२४  यास थांबण्याचा इशारा करून कार  बाजूला घेऊन कारमधील  मुद्देमालची  तपासणी केली .  


गाडीमध्ये प्रथमदर्शनी  खाकी रंगाचे बॉक्स  दिसून आले. सखोल तपासणी केली असता मद्याचे बॉक्स असल्याचे आढळुन आल्यानंतर गाडी व मुद्देमाल   जप्त करण्यात  आला.  तसेच  वाहनाचा चालक  प्रशांत अरूणराव भोर, ( वय ३१  वर्ष रा.काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर )  यास ताब्यात घेतले आहे .गाडीमध्ये   मॅक्डोवल व्हीस्कीचे १८०  मि.ली. क्षमतेचे ०९ बॉक्स , इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ०४  बॉक्स , इम्पिरीअल ब्ल्यू व्हीस्कीचे १८०  मि.ली. क्षमतेचे ०४ बॉक्स  असे एकूण १७ बॉक्स जप्त करण्यात आले.
 जप्त वाहन व मद्याची एकूण किंमत २  लाख ४३  हजार  ५६० रुपये  आहे. वरील आरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९  चे कलम ६५  (क, ङ), ८१  व १०८  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना मे. न्यायालय दौंड, जि . पुणे येथे   हजर करण्यात आले. या विभागाने वारंवार अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले आहेत .  सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. के. कान्हेकर हे करीत आहेत.

  राज्य उपादन शुल्क जी विभागाच्या युनिट दोनने  कारवाई करुन जप्त केला मुद्देमाल व आरोपी समवेत अधीकारी 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article