
हेमंत मुसरीफ, नि.उप महाप्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र यांनी लिहिलेल्या कविता वाचा एका क्लीकवर
Monday, March 22, 2021
Edit
1
कहाणी
गॅलरीत ठेवतो पाणी
प्यायला येते चिमणी
किती दिवसा पासून
चालली गोड कहाणी
आला कुठून कावळा
बावळा होता तहानला
पहात होती ती चिमणी
झटक्यात हाकालला
गॅलरीत ठेवतो पाणी
फिरकत नाही चिमणी
चूक माझी मी जाणली
बदलून गेली कहाणी
2
माठ ..
लालकाळे माठ डेरे
गरीबांचे फ्रीज खरे
अर्धी भाकर खाता
पाणी पिता पोटभरे
सुटे जसे थोडे वारे
थंड पाणी गार झरे
थकल्या पांथस्तांनो
अमृत पिऊनि घ्यारे
माय माती मृदगंध
पाणी देई स्नेहभरे
घोटभर पाणी सांगे
घामाचे महत्व खरे
आरोग्याला हेचं बरे
श्रीमंताही वाटे प्यारे
शहाण्यांना करे माठ
रूप तया असे न्यारे
3)
शिक्षक
ज्ञान दानाचा वसा
घेतली पवित्र दिक्षा
शिक्षक ऋषितुल्य
करतो संस्कृती रक्षा
कोरोना करे हैदोस
विचीत्र सर्वां शिक्षा
शाळा काॅलेज बंद
बदले शिक्षण नक्षा
ऑनलाईन शिकवा
गोंडस नाव सुरक्षा
आधी ताणकामांचा
आणखी एकअपेक्षा
तारे वरली कसरत
शिक्षकांचीचं परिक्षा
पगार मिळेलं कधी
करत राहतो प्रतिक्षा
शिक्षकदिनी सन्मान
शिक्षक नामक वृक्षा
का इतर दिवशी मात्र
केली जाते रे उपेक्षा
4)
निर्णयाचा लंबक
इकडेतिकडे फिरे
परिक्षा घेणार का
तो प्रश्न तसाचं उरे
केंद्रात नि राज्यात
वेगवेगळी सरकारे
निरनिराळी दप्तरे
कोण देईल उत्तरे
संभ्रमात विद्यार्थी
प्रश्नांकीत ते चेहरे
प्यादी बने पटावर
बदलूनजाय मोहरे
रोज चाले परिक्षा
अंत पाहू नका रे
प्रश्नंपडतीलं तुम्हां
देता आम्ही उत्तरे
घेणार का परिक्षा
कोण देणारं उत्तर
संभ्रमात विद्यार्थी
कधी बदले चित्तर
हेमंत मुसरीफ
नि.उप महाप्रबंधक बैंक ऑफ महाराष्ट्र पुणे
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com