-->
शेळ्या मेंढ्यावर लांडग्यांच्या कळपाचे हल्ले; वनखात्याकडुन शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप

शेळ्या मेंढ्यावर लांडग्यांच्या कळपाचे हल्ले; वनखात्याकडुन शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप

मोरगांव : बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील सहा  गावांत गेल्या तीन महीन्यात शेळ्या मेंढ्यावर लांडग्यांच्या कळपाचे हल्ले झाले होते. या बाधीत शेतकऱ्यांना  सत्याएंशी हजार रूपये नुकसान भरपाई वनखात्याकडुन मंजुर झाली आहे. या धनादेशाचे वाट्प आज करण्यात आले.
      तालुक्याच्या सहा गावात गेल्या तीन  महीन्यात अन्नाच्या शोधार्थ  लांडग्याच्या कळपाने  शेळ्या मेंढ्या वाडग्यावर हल्ला चढवत शेळ्याव मेंढ्या  फस्त केल्या होत्या. जोगवडी येथील ज्ञानेश्वर जयराम महानवर, दादासो सूर्यकांत जाधव सोनवडी, बाबासो दत्तात्रेय गाढवे आंबी, लक्ष्मण मल्हारी तांबे  व  लक्ष्मण नामदेव लकडे कोळोली,  गणेश सोमा मोटे  रा.मोढवे, देवीदास तात्याबा पिसाळ जळगाव या शेतकऱ्यांच्या शेळ्या - मेंढ्यांच्या  वाडग्यावर  लांडग्यांच्या कळपाने हल्ले केले होते.  यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वनखात्याच्यावतीने वनपाल  अमोल पाचपुते, वनरक्षक शकुंतला गोऱ्हे,  माया काळे यांनी सदर घटनेचे पंचनामे नोंद करुन वनखात्याला नुकसान भरपाईचे प्रस्ताव दाखल केले होते.
       यानुसार उप  वनसंरक्षक राहुल पाटील  व साहाय्य  वनसंरक्षक मयूर बोठे  यांनी संबंधीत शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजुर केली आहे.  या भुकसान भरपाई धनादेशाचे वितरण चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांच्या हस्ते  करण्यात आले  यावेळी वनपाल अमोल पाचपुते,  बाधीत शेतकरी व वनकर्मचारी गणपत भोंडवे   आदी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी वनखात्याने नुकसान भरपाई दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article