
फलटण-पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ, बारामती-फलटण रेल्वेमार्ग रखडलेलाच
Tuesday, March 30, 2021
Edit
फलटण - आज (मंगळवार) फलटण रेल्वे स्थानकावरून उद्घाटनानिमित्त विशेष गाडी चालविण्यात आली आहे. या गाडीचे उद्घाटन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ऑनलाइन झाले.
या गाडीस सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी, सासवड रोड या स्थानकांवर थांबा असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी या रेल्वेची नियमित सेवा 31 मार्चपासून सुरू होईल. गाडी क्रमांक 01436 पुणे येथून 5 वाजून 50 मिनिटांनी सुटेल व फलटण येथे साडेनऊ वाजता पोचेल व परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01436 फलटण येथून संध्याकाळी सहा वाजता सुटेल व पुणे येथे साडेनऊ वाजता पोचेल. गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल. रविवारी ही सेवा बंद राहील.
बारामती-फलटण रेल्वेमार्ग रखडलेलाच
फलटण-बारामती रेल्वे मार्गासाठी खाजगी वाटाघाटीने मार्ग निघण्यात अडचणी येत आहेत त्या मुळे जमीन अधिग्रहणासाठी नाहक वेळ वाया जात आहे. रेल्वे मार्गाचे प्रलंबीत काम त्वरित सुरु करावे अशी लोकांची अपेक्षा आहे.
फलटण - बारामती रेल्वे मार्ग ३७ कि. मी. लांबीचा आहे. त्यामध्ये बारामती तालुक्यातील १३ व फलटण तालुक्यातील ३ गावातील जमिनींचे भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी बारामती तालुक्याला ११५ कोटी व फलटण तालुक्याला १५ कोटी रुपये उपलब्ध केले आहेेेत.