
मोरगाव: मयुरेश्वर मंदिर कोरोनामुळे बंद असल्याने भाविकांचे पायरी दर्शन
Wednesday, March 31, 2021
Edit
मोरगांव : संकष्टी चतुर्थीला होणारी गर्दी व कोरोनाचा वाढवा फैलाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आज दि ३१ रोजी अष्टविनायक तिर्थक्षेत्र मोरगांव ता बारामती येथील मयुरेश्वर मंदिर बंद ठेवले होते. प्रशासनाच्या सुचनेनुसार आज सर्व भावीकांना श्रींच्या दर्शनासाठी मंदिर बंद नेहमी गजबजलेल्या मोरगावात शुकशुकाट जाणवत होता.
आज संकष्टी निमित्ताने पहाटे गुरव मंडळी तर दुपारी ७ वाजता सालकरी ढेरे यांची पुजा झाली. बारामती प्रांताधीकारी दादासाहेब कांबळे यांनी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा आदेश काढला होता. यानुसार आदेशाचे पालन करून मंदिर बंद ठेवले होते. परीसरातील भावीकांची होणारी संभाव्यगर्दी लक्षात घेता आदेशानुसार चिंचवड देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी दगडी फरस व येण्याचे मार्ग लोखंडी बॅरीकेट लावून बंद ठेवले होते.
दुपारी श्रींची देवस्थान मार्फत पुजा झाली. दिवसभारात केवळ एखादा दुसरा भावीक पायरी व कळस दर्शन घेऊन जाताना आढळत होता. सायंकाळी ७ नंतर परीसरातील भक्तांची मंदीयाळी जाणवत होती. भावीकांच्या शुकशुकाटमुळे येथील दुकानदारांचे आतोनात नुकसान झाले.
व्यवसाईकांकडून कोरोनाचे संकट जाण्यासाठी मयुरेश्वराला साकडे घातले जात होते. रात्री चंद्रोदयाच्यावेळी नेहमीप्रमाणे निवडक गुरव मंडळींच्या पस्थितीत आरती झाली . यानंतर श्रींस महानैवेद्य दाखविण्यात आला .तर गणेश भक्तांना उद्या दि १ रोजी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे.
मोरगाव ता. बारामती येथील मयुरेश्वर मंदिर कोरोनामुळे बंद असले तरी पायरी दर्शन घेताना भक्त