
कोऱ्हाळे बुद्रुक येथील माळशिकारेवस्ती येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
Tuesday, March 30, 2021
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक येथील माळशिकारे वस्ती येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष लालासाहेब माळशिकारे, माजी संचालक शेखर खंडागळे, उपसरपंच लता नलवडे, माजी सरपंच दिलीप खोमणे, दत्तात्रय भगत, ग्रामपंचायत सदस्य वैशाली माळशिकारे, कल्पना माळशिकारे, सदस्य अनिल शिंदे, बजाबा माळशिकारे, अजित माळशिकारे, नानासो माळशिकारे, बाळासो माळशिकारे, पांडुरंग महांगडे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या २५: १५ लेखाशीर्षच्या निधीतून माळशिकारे वस्ती ते गावठाण असा 50 लाख रुपयांचा रस्ता, १० लाख रुपयांचा सारपाई रस्ता, १३ लाख ५० हजारांचे भूमिगत गटर या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच यावेळी एक हाय मास्ट दिवा बसवण्यात आला. येणाऱ्या काळात माळशिकारे वस्ती च्या विविध प्रलंबित कामांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य वैशाली माळशिकारे, कल्पना माळशिकारे व अनिल शिंदे यांनी सांगितले.