
इंदापूर; विंग्स फॉर ड्रिम टिमच्या वतिने गरजूंना आठवड्यातून एक दिवस अन्नदान उपक्रम सुरू
Monday, March 29, 2021
Edit
इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर शहरात दिवसभर पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन फिरणाऱ्या गरिब व गरजूंना विंग्स फॉर ड्रिम टिमच्या वतिने आठवड्यातून एक दिवस अन्नदान करण्याचा नविन उपक्रम चालू केला आहे.
विंग्स फॉर ड्रिम या संस्थेचे चेअरमन रिचर्ड अलमेडा आणि राहुल शर्मा, संस्थेचे कार्यक्रम संयोजक मनोज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत सुमित वाघमारे व स्वयंसेवक विनायक म्हेत्रे, तुषार म्हेत्रे, विशाल चितारे, योगीराज म्हेत्रे, नवाज तांबोळी यांच्या समवेत हे कार्य मागील दोन आठवड्यापासून चालू केले असून दर रविवारी या टिमच्या वतिने इंदापूर शहरातील गरिब व गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे.
या संस्थेचे इंदापूर तालुका प्रतिनिधी सुमित वाघमारे यांनी भविष्यात बरेच उपक्रम इंदापूर तालुक्यात राबविण्याचे नियोजन आमची संस्था करणार आहे असे देखील सांगितले. पुणे, मुंबई, हैद्राबाद, आणि नागपुर नंतर बरेच उपक्रम आता बारामती व इंदापूर तालुक्यात विंग्स फॉर ड्रिम या संस्थेच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा व ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आमची संस्था करणार आहे असे सांगितले.
तसेच तालुक्यातील इच्छुक व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी होऊन या सामाजिक कार्यास हातभार लावावा असे अवाहन देखील केले.