
माळेगाव कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी बन्सीलाल आटोळे
Friday, July 30, 2021
Edit
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बन्सीलाल आटोळे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडीनुसार ही निवड करण्यात आली असून यामध्ये पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनानुसार बन्सीलाल आटोळे यांची पुढील एक वर्षासाठी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांच्यासह संचालक उपस्थित होते