
धक्कादायक......महाराष्ट्रात पहिला झिका व्हायरसचा रुग्ण सापडला, पुरंदर तालुक्यातील बेलसर गावातील पन्नास वर्षीय महिलेला झिका लागण
Saturday, July 31, 2021
Edit
पुरंदर तालुक्यातील बेलसर गावातील पन्नास वर्षीय महिलेला झिका व्हायरस ची लागण झाल्याचे समोर आले आहे. एएनआय ने महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान एएनआय ने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर महाराष्ट्रातील हा पहिला रुग्ण आढळला चे बोलले जात आहे. मात्र या रुग्णाची प्रकृती स्थिर असून काळजी घ्यावी असे महाराष्ट्र आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
डासांपासून होणारा झिका व्हायरस ची लक्षणे म्हणजे ताप, सांधेदुखी, अंगदुखी, उलटी, अस्वस्थता, डोकेदुखी अशी लक्षणे आहेत. याच बरोबर डेंगूमध्ये ज्याप्रमाणे शरीरावर लाल पुरळ उठतात, तशाच स्वरूपाची चट्टेही यामध्ये आढळून येतात. दरम्यान या परिसरातील पाच किलोमीटर अंतरातील गावांना सतर्कतेचा इशारा आरोग्य खात्याने दिला आहे.
झिका व्हायरस आढळल्याने मात्र खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क होत असतानाच झिकाचे पुणे जिल्ह्यात आगमन झाल्याने आरोग्य खात्याकडे नवीनच चिंता निर्माण झाली आहे.