
चिंताजनक...... बारामतीत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच; आज नवीन ८१ रुग्णांची भर तर एका आठवड्यात 9 जणांचा मृत्यू
Tuesday, August 24, 2021
Edit
बारामतीत कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाही पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे पण बारामतीत कोरोनाचा आलेख वाढताच आहे.
कालचे शासकीय (23/08/21) एकूण rt-pcr नमुने 534. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-45. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---74 त्यापैकी पॉझिटिव्ह --13-. कालचे एकूण एंटीजन -1086. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.23. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 45+13+23 =81. शहर-28 ग्रामीण-53. एकूण रूग्णसंख्या-28192 एकूण बरे झालेले रुग्ण-27154. एकूण आज डिस्चार्ज--57 मृत्यू-- 711.
17 तारखेपासून 23 तारखेपर्यंत एका आठवड्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.