
समाजाला भक्ती मार्गाची आस लागावी तसेच वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी हवेलीत सामाजिक संस्थेची स्थापना
Sunday, August 1, 2021
Edit
हवेली : समाजाला भक्ती मार्गाची आस लागावी तसेच वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार व्हावा यांसारख्या अनेक उद्दिष्टाने हवेली तालुक्यात सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे .ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी सेवाभावी संस्था या नावाने ही संस्था स्थापन केली असुन याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आज आव्हाळवाडी ता. हवेली येथे संपन्न झाला.
सध्याच्या काळात भक्ती मार्गापासून भरकटलेल्या व्यक्तीला, समाजाला भक्ती मार्गाची आस लागणे व संताचे थोर विचार पोहचवणे आवश्यक आहे .यासाठी हवेली तालुक्याच्या दहा गावतील वारकरी, दिंडी प्रमुख, प्रवचनकार व कीर्तनकार यांनी एकत्र येऊन ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी सेवाभावी संस्था स्थापना केली आहे . याचे आज उद्घाटन आव्हाळवाडी ता. हवेली येथील निळकंठेश्वर मंदिरात संस्थेचे अध्यक्ष शहाजी दादा आव्हाळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना आव्हाळे सांगितले की समाजातील रंजल्या गांजल्यांना मदत तसेच संस्थेची उद्दिष्ट तळागाळात पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे . या कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष मल्हारी बापू गावडे (वाडेबोल्हाई) सचिव आनंद महाराज तांबे(थेऊर) सहखजिनदार विलास दादा उंद्रे (कोलवडी) खजिनदार बाळासाहेब बापूसाहेब सातव (वाघोली) हनुमंत महाराज शिवले (वढू) ज्ञानोबा दगडू काकडे (वडगाव शिंदे) निवृत्ती महाराज गलांडे (वडगाव शेरी) भाऊसाहेब आव्हाळे (आव्हाळवाडी)तात्याबा हरगुडे (केसनंद) सोमनाथ महाराज भालेराव (आळंदी देवाची) या कार्यक्रमसाठी ग्रामस्थ,जेष्ठ नागरिक व वारकरी मंडळी उपस्थित होती. यावेळी उपस्थितांना तुळशीच्या रिपाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्थाविक आनंद तांबे तर सुत्रसंचालन प्रकाश दादा आव्हाळे यांनी केले.