
कोतवालांना चतुर्थ श्रेणीसह, वारसदारांना अनुकंप तत्वावर भरती यासह विविध मागण्यांसाठी कोतवालांचे राज्य संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र, मागण्या मान्य न झाल्यास काम बंदचा इशारा
Tuesday, August 10, 2021
Edit
मोरगाव : राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीसह, वारसदारांना अनुकंप तत्वावर भरती यासंह विविध मागण्यांसाठी कोतवालांच्या राज्य संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्य संघटनेने नमुद केल्याप्रमाणे दि. १६ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलनाचा ईशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास या आंदोलनात बारामती तालुका कोतवाल संघटनाही सहभागी होणार आहे. याबबातचे निवेदन निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना तालुका संघटनेच्या वतीने दिले आहे.
राज्यातील ग्रामीण भागात महसूल खाते व जनता यामध्ये कोतवाल एक दुवा समजला जातो. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही चतुर्थ श्रेणीबाबत त्यांच्या समस्या जैसे थे आहेत. यामुळे कोतवालांच्या राज्य संघटनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना विविध मागण्यांसाठी निवेदन दिले आहे. यामध्ये १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करण्याची विनंती केली आहे. मागण्या मान्य न १६ ऑगस्टपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन होणार आहे. या कामबंद आंदोलनात बारामती तालुका कोतवाल संघटनाही सामील होणार आहे. याबाबतचे निवेदन काल नायब तहसिलदार धनंजय जाधव यांना दिले. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष खोमणे, सचिव शेखर खंडाळे, शैलेश नेवसे, विजय स्वामी सचिन निकम,राहुल पोमनें, अंकुश खोमणे यासह सर्व कोतवाल बांधव उपस्थित होते.
राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळावी, कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना अनेक कोतवालांना आपले प्राण गमवावे लागले असल्याने त्यांच्या वारसदारांना अनुकंप तत्त्वावर कामावर घ्यावे .सेवानिवृत्ती नंतर कोतवालांना कुठलाही लाभ मिळत नसल्याने एकरकमी दहा लाख एपये मिळावेत, शासनाने कोतवालां संदर्भात ६ फेब्रुवारी २०१९ रोजी काढलेले मार्गदर्शक पत्र रद्द करण्यात यावे . कोतवालाना तलाठी तत्सम पदामध्ये पन्नासटक्के आरक्षण द्यावे आदी मागण्या राज्य संघटनेच्यावतीने शासनाकडे केल्या असल्याचे तालुकाध्यक्ष संतोष खोमणे यांनी सांगितले.