
बारामती: कोऱ्हाळे परिसरात बिबट्याची दहशत: बिबट्याच्या हल्ल्यात एका कालवडाचा मृत्यू
Friday, August 13, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु परिसरात आज रात्री ८ च्या दरम्यान एका कालवडींवर बिबट्याने हल्ला केला यामध्ये त्या कालवडाचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या वतीने कंक साहेब तसेच इतर वनक्षेत्रातील वनकर्मचारी व को-हाळे बु चे सरपंच रविंद्र खोमणे यांनी
तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घाबरून न जाता
शेतकरी वर्गाने जनावरांची व छोट्या मुलांची काळजी घेण्याचं आव्हान केले आहे.
तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाताना खबरदारी घेण्याचे आव्हान केले आहे सकाळी पंचनामा करून नक्की बिबट्या आहे की इतर काही याची हानिशा सकाळी करू असे त्यांनी सांगितले.