
कृषिदुत रोहित चव्हाण याने माळेगांव येथे शेतकऱ्यांसाठी राबवले शेतीविषयक विविध उपक्रम
Saturday, August 14, 2021
Edit
माळेगाव : फलटण एडयुकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयातील कृषिदुत चव्हाण रोहित बापुराव याने माळेगांव,ता.बारामती येथे शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक विविध उपक्रम राबवले.
अभ्यासक्रमातील ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव या विष्यांतर्गत प्रात्याशिकांसाठी गावातील शेतकऱ्यांना मातीपरिक्षण,बीजप्रक्रिया,एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन,फळबाग लागवड,खत व्यवस्थापन,पाणी व तन व्यवस्थापन, औषधांचा योग्य वापर आदींबाबत प्रभोदन व जनजागृती निर्माण केली. तसेच आधुनिक शेती व तंत्रज्ञानाची महिती शेतकऱ्यांना दिली.यासाठी माळेगांव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी.निंबाळकर,कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.व्ही.पी.गायकवाड, प्रा.एन.एस.ढालपे,प्रा.ए.एस.नगरे,प्रा.एस.वाय.लाळगे,प्रा. जी.एस.शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले.