-->
 गावात खेळीमेळीचे वातावरण असेल तरच गावचा विकास होऊ शकतो - दुर्योधन भापकर

गावात खेळीमेळीचे वातावरण असेल तरच गावचा विकास होऊ शकतो - दुर्योधन भापकर

मोरगाव :  गावचा विकास करायचा असला तर गावात खेळीमेळीचे वातावरण पाहीजे. असे असल्यास गाव समृद्ध झाल्याशिवाय राहत  नाही असे प्रतीपादन तरडोली ता. बारामती येथे  खडकी छावणी परीषदेचे माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी केले 
तालुक्याच्या ग्रामीण भागात पर्यावरणास पुरक अशी वृक्ष लागवड केली आहे. मात्र लावलेली झाडे जगली जगणे आवश्यक असल्याने  बारामती तालुक्याच्या  भागात झाडांना पाणी देण्यासाठी  कायम स्वरुपी  मोफत टॅंकरचे नियोजन केले असल्याचे   दुर्योधन भापकर यांनी  सांगितले. तालुक्याच्या  पंचायत समीतीच्या मोरगाव गणात येणाऱ्या मोरगांव, तरडोली, लोणी भापकर, सायंबाची वाडी आदी परीसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे .
या गावासाठी देण्यात येणाऱ्या मोफत टॅंकरचा लोकार्पण कार्यक्रम आज तरडोली येथे झाला. 

यावेळी  खडकी कॉन्टुमेट बोर्डचे माजी उपाध्यक्ष  दुर्योधन भापकर, पंचायत समीती सदस्य राहुल भापकर  तरडोलीचे सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव,  सामाजिक कार्यकर्ते  हनुमंत भापकर,  किसन तांबे, संजय पाटील , बंटी गाडे  आदी उपस्थित होते.  पुढे  बोलताना भापकर यांनी सांगीतले की बारामती तालुक्यामध्ये आपल्या भागात जास्तीत जास्त झाडे जगली पाहीजेत. तसेच  गावच्या विकासासाठी  कधीही मदतीचा हात देण्याचे आश्वासन खडकी कन्टोमेंट बोर्डचे  माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी केले 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article