
माळेगावच्या माजी सरपंचांना पुन्हा अटक करण्याचे मोक्का न्यायालयाचे आदेश; पोलिसांचा अहवाल फेटाळला! उद्या मोक्का कोर्टात हजर करावे लागणार!
Tuesday, August 17, 2021
Edit
बारामती (उमेश दुबे) : माळेगाव येथील रविराज तावरे गोळीबार प्रकरणातील आरोपी माळेगावचे माजी उपसरपंच जयदिप तावरे यांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचा पोलिसांनी दिलेला अहवाल मोकका न्यायालयात 18 ऑगस्टपासून ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
माळेगाव येथील राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर 31 मे 2021 रोजी गोळीबार झाला होता यावरून पोलिसांनी प्रशांत पोपट मोरे, विनोद उ़र्फ टॉम पोपट मोरे, आकाश प्रशांत मोरे, राहूल उ़र्फ रिबल यादव यांना अटक केली होती. यानंतर याच प्रकरणात माळेगावचा माजी सरपंच जयदिप तावरे यांनादेखील अटक केली होती.
मात्र या तपासादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी जयदिप तावरे यांच्याविरुद्ध कुठलाही पुरावा नसल्याचे नमूद करून कलम 169 अन्वये मोक्का न्यायालयात 21 जुलै 2019 रोजी अर्ज करून जामीनावर सोडण्याची विनंती केली होती. त्यावरून मोक्का न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला होता. यानंतर माळेगावात आतषबाजी तसेच दुधाचा अभिषेक करण्यात आला होता.
मात्र, 16 ऑगस्ट रोजी रोहिणी तावरे यांच्यावतीने अॅड.योगेश पवार यांनी युक्तिवाद करून मोक्का न्यायालयात अद्याप कागदपत्रे समोर नसताना पोलिसांनी दिलेला 169 चा अहवाल नामंजूर करावा असा युक्तिवाद केला होता. तो ग्राह्य धरून मोक्का न्यायालयाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेला 169 चा अहवाल नामंजूर केला आणि जयदिप तावरे यास अटक करून 18 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.