
रविराज तावरे गोळीबार प्रकरणी माळेगाव चे माजी सरपंच जयदीप तावरे यांना मोक्का न्यायालयाकडून कोर्टात हजर राहण्यासाठी ४ आठवड्यांची मुदतवाढ
Wednesday, August 18, 2021
Edit
माळेगाव चे माजी सरपंच जयदीप दिलीपराव तावरे यांना मोक्का न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून त्यांना कोर्टात हजर होण्यासाठी चार आठवड्याकरिता मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या सामार्थाकांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे भरते आले आहे. आज मोका कोर्टात हजर राहण्याचे आदेश असल्यामुळे गावात सर्वत्र चर्च्या रंगल्या होत्या. आज काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र माजी सरपंच जयदीप दिलीपराव तावरे यांना कोर्टाने दिलासा दिल्याने सामार्थाकांनी काही काळ का होईना सुटकेचा श्वास सोडला आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरणी मोक्कांतर्गत जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना अटक करून हजर करण्याचे आदेश मोक्का न्यायालयाने दिले होते मात्र जयदीप तावरे यांच्या वकिलांनी ठोस पणे बाजू मांडल्याने न्यायालयाने तावरे यांना हजर राहण्यास पुढील चार आठववड्याची मुदत दिली आहे. या संदर्भात जयदीप तावरे यांच्या बाजूने अॅड. सचिन वाघ, अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड.सत्यम निंबाळकर, अॅड.धैर्यशील जगताप यांनी बाजू मांडली.
दरम्यान रविराज तावरे गोळीबार प्रकरणी माळेगाव चे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पुन्हा अटक करून आज 18 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश मोका न्यायालयाने दिले होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेते रविराज तावरे लाखे यांच्यावर 31 मे 2021 रोजी गोळीबार झाल्याबाबत त्यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य रोहिणी रविराज तावरे लाखे यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता त्यानुसार पोलिसांनी प्रशांत पोपटराव मोरे, विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल यादव यांसह एका नाबालिकाला अटक केली होती.
दरम्यान या प्रकरणी सहा जुलै 2021 रोजी आरोपी जयदीप तावरे यांना अटक केली होती मात्र तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी जयदीप तावरे यांच्याविरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत असे नमूद करून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 169 अन्वये दिनांक 21 जुलै 2021 रोजी पूना मोका न्यायालय यांना अर्ज करून त्यास जामिनावर सोडण्याची विनंती केली होती दरम्यान मोक्का न्यायालय श्री जीपी अगरवाल यांनी फिर्यादी रोहिणी तावरे यांना आपले म्हणणे मांडण्याचे बोलावणे केले होते.
फिर्यादी रोहिणी तावरे यांनी मोक्का न्यायालयात त्यांचे वकील अॅड योगेश द. पवार यांच्यामार्फत हजर होऊन विरोध याचिका केली होती. दरम्यान 28 रोजी मोक्का न्यायालयाने आरोपी जयदीप तावरे यांना तात्पुरता जामीन यावर मुक्त केले होते. ते जामिनावर सुटल्यानंतर गावात मोठा जल्लोष झाला त्याच बरोबर त्यांचा दुग्धाभिषेक करून त्यांची शुद्धी ही करण्यात आली होती. हा अभिषेक सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता परंतु दिनांक 16/ 8/ 2019 रोजी फिर्यादी रोहिणी तावरे यांच्यावतीने अॅड. योगेश पवार यांनी युक्तिवाद करताना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 169 प्रमाणे पूर्व तपासणी अंती तसा अहवाल न्यायालयात देणे कायद्याने उचित होते. गुन्हा गंभीर असून त्यात सखोल तपास करणे न्यायाचे होणार आहे. कोर्टासमोर तपास कागदपत्रे नसल्यामुळे 169 अहवाल नामंजूर करणे कायद्याच्या बाजूने होणार असल्याबाबत युक्तिवाद केला. फिर्यादी तर्फे चा युक्तिवाद मोक्का न्यायालय श्री जी पी अगरवाल यांनी मान्य करून विरोध याचिका मंजूर केली तसेच तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा फौजदारी दंड संहिता चे कलम 169 चा अर्ज नामंजूर करून उपविभागीय पोलिस अधिकारी यांना आरोपी तावरे यांना अटक करून दिनांक 18/ 8 /2021 रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.