
वाणेवाडी: कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
Tuesday, August 3, 2021
Edit
सोमेश्वर नगर: वानेवाडी येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने वानेवाडी ता बारामती येथे नुकत्याच कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये येलो बेल्ट स्पर्धेत यशस्वी भोसले व जुबेर शेख या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला ही स्पर्धा वानेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रागणात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला वाणेवाडी मुरूम सोमेश्वर नगर करंजेपुल वाघळवाडी सोरटेवाडी दहा फाटा बारामती येथील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री. संतोष महानवर
सिव्हिल इंजिनिअर
आर्किटेक्ट अँड कन्सल्टिंग इंजिनिअर यांच्या हस्ते पार पडले या वेळी बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले दुशांत चव्हाण निरंजन निगडे गणेश पवार राहुल जेधे विकास भोसले संजू जाधव राहुल खरात बाळासाहेब गर्जे उपस्थित होते स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे
येलो बेल्ट यशस्वी भोसले स्वरा भोसले जुबेर शेख अनुज गर्जे युगांत खरात रेहान शेख
ऑरेंज बेल्ट कार्तिकी पवार शौर्य कोंडे मयुरेश भोसले
ब्ल्यू बेल्ट सोनाक्षी जेधे अविनाश गायकवाड विश्वजीत आगवणे
पर्पल बेल्ट ओजस निगडे सोमेश बाबर
ब्राउन बेल्ट सेकंड जयदीप जाधव प्रणव गायकवाड वैष्णवी जाधव या विद्यार्थ्यांनी अजिंक्यपद पटकावले*
यावेळी संस्थेचे चिफ मास्टर धनंजय भोसले उपस्थित होते संस्थेचे ग्रँड मास्टर प्रकाश रासकर यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते ब्लॅक मास्टर मोनिका गाढवे निखिल सूर्यवंशी अनिकेत शिंदे अजित कराडे शौनक महानवर आशितोष साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.