-->
कोऱ्हाळे बु गावातून गायी चोरणाऱ्यांचा वडगांव निंबाळकर पोलिसांनी लावला छडा: कोऱ्हाळे बु गावातीलच एकासह इतर ३ जण जेरबंद

कोऱ्हाळे बु गावातून गायी चोरणाऱ्यांचा वडगांव निंबाळकर पोलिसांनी लावला छडा: कोऱ्हाळे बु गावातीलच एकासह इतर ३ जण जेरबंद

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील कोऱ्हाळे बु।। येथील श्री.राजेंद्र छगन बिबे वय 43 वर्षे यांचे घरासमोर बांधलेल्या एच.एफ. जातीची 75 टक्के प्रतीची 1 गाय व 1 कालवड असा एकुण 46,000 /- रू.किंमतीच्या 1 गाय व 1 कालवड दिनांक 06/07/2021 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी चोरून नेलेल्या होत्या.
        त्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 251/2021 भा.द.वी कायदा कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्हयाचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ लांडे व त्यांचे तपासपथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे करुन सदर गुन्हयातील संशयित आरोपी नामे 
           1) अशरफ जावेद शेख वय 20 वर्षे रा.को-हाळे बु ।। ता.बारामती जि.पुणे 02) अक्षय गुलाब पवार वय 24 वर्षे रा.आळंदे ता.भोर जि.पुणे 03 ) सचिन विष्णु कारबळ वय 26 वर्षे रा.इंगवळी ता.भोर पुणे 04 ) आकाश सुनिल वाघमारे वय 23 वर्षे रा.आळंदे ता.भोर जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी गायी चोरीचा गुन्हा केलेचे कबुल केलेने आरोपीतांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे . तसेच सदर गुन्हा करणेसाठी वापरणेत आलेले वाहन टाटा मोटर वेगो गाडी नंबर एम.एच 12 एम.व्ही 6618 जप्त करण्यात आलेली असुन गेला माल गाय व कालवड हा लागलीच आरोपींकडुन जप्त करणेत आलेल्या आहेत. 
           सदरची कामगिरी ही मा.श्री.अभिनव देशमुख सो., मा.पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री.मिलिंद मोहीते सो., अपर पोलीस अधिक्षक सो बारामती, मा.श्री.नारायण शिरगावकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे श्री.सोमनाथ लांडे व त्यांचे तपासपथकातील पोलीस अंमलदार पोहवा/ महेंद्र फणसे, पो.ना.सलमान खान, सागर चौधरी, पो.कॉ.पोपट नाळे, ज्ञानेश्वर सानप, रामचंद्र आढाव, सचिन दरेकर यांनी केलेली आहे. असुन पुढील तपास पोलीस हवालदार श्री.महेंद्र फणसे हे करीत आहेत.

#संग्रहित छायाचित्र

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article