
वाघळवाडी येथे बारामती तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न
Monday, August 23, 2021
Edit
सोमेश्वरनगर- पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी दिन साजरा केला जातो.
त्यानिमित्ताने बारामती तालुका कृषि विभाग कार्यालयाच्या वतीने वाघळवाडी तील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पीक व्यवस्थापनाबरोबरच सेंद्रिय पिक पद्धती, तुटलेल्या ऊसाचे पाचट व्यवस्थापन , तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा कमीत- कमी वापर करणे या गोष्टींबद्दल बारामती तालुक्याच्या कृषि अधिकारी मा. सौ.सुप्रिया शिळीमकर - बांदल यांनी मार्गदर्शन केले.त्याबरोबरच उपस्थित शेतकऱ्यांना ई -पीक पाहणी या डिजिटल ॲपची माहिती दृकश्राव्य माध्यमातून देण्यात आली .याप्रसंगी बारामती तालुका कृषि अधिकारी मा.सौ.सुप्रिया शिळीमकर - बांदल यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत वाघळवाडी- सोमेश्वरनगर व ग्रामस्थांच्या वतीने त्यांची कृषि अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सरपंच सौ. नंदाताई सकुंडे यांचे शुभहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वाघळवाडी चे कृषी सहाय्यक ओंकार चव्हाण यांनी नियोजन केले. सोसायटीचे संचालक अनिल शिंदे, युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे, बाळासाहेब सावंत,नारायण जाधव,भगवान सावंत, बापुराव सावंत,नबाजी सावंत, चंद्रकांत सावंत, सदाशिव सावंत, सोमनाथ मांगडे, संभाजी भुजबळ, प्रवीण जाधव, सुभाष शिंदे, संकेत सावंत, रवींद्र सावंत आदी शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांचा सन्मान उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सदस्य हेमंत गायकवाड, पांडुरंग भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बारामती शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश सावंत यांनी केले.