-->
बारामती: जिल्हा परिषदेच्या कुषिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित केलेले अरविंद निंबाळकर यांचा पेरू फळबागेचा यशस्वी प्रयोग: वर्षात २ एकरात ८ लाखांचा नफा

बारामती: जिल्हा परिषदेच्या कुषिनिष्ठ पुरस्काराने सन्मानित केलेले अरविंद निंबाळकर यांचा पेरू फळबागेचा यशस्वी प्रयोग: वर्षात २ एकरात ८ लाखांचा नफा

वडगांव निंबाळकर- पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका प्रयोगशील शेतकऱ्याचा तालुका म्हणून ओळखला जातो. या भागाला अवर्षणाचा सामना करावा लागत असला तरीही शेतकरी हिमतीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला प्रगतावस्थेत नेण्याचा प्रयत्नात असतो.
                          बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील प्रगतशील शेतकरी अरविंद बाबुराव निंबाळकर यांनी कारखान्यातील नोकरी सोडून शेतीची कायमच आस असल्याकारणाने त्यांनी त्यांच्या शेतामध्ये नवनवीन शेती तंत्रज्ञान विकसित केले.
                   यांना 2017 मध्ये जिल्हा परिषद चा कृषिनिष्ठ पुरस्कार आणि दिल्ली चा महिंद्रा समृद्धी भारत पूरस्कार 2017 यांनी पुरस्कृत केले.
  कुटुंबाने शेतीला घेतले वाहून-
     सकाळी उठल्यावर निंबाळकर यांचा morning walk शेतातच असतो. सायंकाळी शतपावली हि शेतपावली असते, तसेच घरामध्ये कृषी पदवीधर असल्याने त्यांचे तांत्रिक ज्ञान शेतीला पुढे नेण्यासाठी उपयोगी ठरते.
                           मार्केट चा उत्तम अभ्यास करून त्यानुसारच पीक व क्षेत्र यांचे नियोजन केले जाते. त्यामुळेच त्यांनी या वर्षी  वेगवेगळ्या जातीच्या शिमला मिरचीची 4 एकर polyhouse मध्ये लागवड केली . 
निसर्गाची वारंवार हुलकावणी शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे ते फळबाग म्हणून पेरूच्या लागवडीकडे वळाले. 
       पेरूच्या फळामध्ये ‘क’ जीवनसत्व तसेच खनिजद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. पेरूच्या फळापासून जॅम, जेली, आईस्क्रीम, सरबत तसेच हवाबंद डब्यातील फोडी तयार करता येतात. पेरूचे झाड टणक असल्यामूळे शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी झाडाचा उपयोग होतो. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे पिक कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीचे असल्याने ह्या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.पेरू(Guava) फळपिक कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक आहे. 
निंबाळकर यांनी 2016 साली VNR जातीच्या पेरूचा नवीन प्रयोग सुरू केला.
पेरूचा नवीन प्रयोग -
                         या फळबागबाबत शेतकरी अरविंद बाबुराव निंबाळकर यांना विचारले असता ते म्हणाले की छत्तीसगढ येथून VNR या जातीची रोपे उपलब्ध करण्यात आली असून ती 2 एकारामध्ये लावण्यात आली आहेत.
 बागेत पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे.
      फळपिकाची लागवड केल्यानंतर दोन ते अडीच वर्षात उत्पनाला सुरुवात झाली. 2 एकरातून  त्यांना या वर्षी  25 ton उत्पन्न मिळाले असून त्यातून निव्वळ नफा पाहिला तर 7-8 लाख रुपये मिळाला.
                       महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालय पुणे च्या ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2021-22 च्या अंतर्गत कृषिदूत यशोदिप शांताराम पिंगळे आणि कृषिदूत स्वप्नील विष्णू पंढरे यांनी मार्गदर्शक शिक्षक  डॉ. उत्तम जगदाळे, डॉ मृणल अजोतिकार व डॉ सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष भेट देऊन निंबाळकर यांनी केलेल्या पेरू फळबागेविषयी माहिती घेतली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article