-->
सांगवीच्या जिल्हा परिषद शाळेतील किचन शेडचे कुलूप तोडून ३० ते ३५ हजार रुपयांच्या वस्तूंची चोरी

सांगवीच्या जिल्हा परिषद शाळेतील किचन शेडचे कुलूप तोडून ३० ते ३५ हजार रुपयांच्या वस्तूंची चोरी

सांगवी : कोरोनामुळे आजही कुलूपबंद शाळा असल्याचा फायदा घेत तीन ते चार जणांनी बारामतीतील सांगवी येथील जिल्हा परिषद शाळेतील स्वयंपाक घरात चोरी झाली आहे. किचन शेडचे कुलूप तोडून शटर उचकटून जवळपास ३० ते ३५ हजार रुपयांच्या वस्तूंची चोरी करून मालमत्तेचे मोठे नुकसान केल्याचे उघडकीस आले आहे. 
       यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी हा प्रकार घडून आला. याबाबत माळेगाव पोलीस स्टेशन येथे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे.  शाळेच्या गेटवरून चढून आत प्रवेश करत चोरी करताना त्यांनी सीसीटीव्ही केमेरे फिरवत त्याच्या केबल वायरी कापून टाकल्या आहेत. तर जुन्या वर्ग खोल्यांचे दरवाजे दगडाने ठेचून तोडले आहेत. तर खुर्च्या, ढोल ताशे अंगणवाडीच्या परिसरातील टॉयलेट बाथरूम मध्ये टाकून देण्यात आले आहे. असे विद्रुपीकरणामुळे जिल्हा परिषद शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शाळेत शटर उचकटत असताना काही ग्रामस्थांनी चोरी करणाऱ्या तरुणांना पाहिले असल्याचे शिक्षकांना माहिती दिली. 
         यावेळी मुख्याध्यापक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती व गावातील पदाधिकारी यांनी घटना स्थळी पाहणी केली. दरम्यान काही पदाधिकार्यांनी गावातीलच तरुण असल्याने त्यांना बोलावून घेऊन मिटवून घेण्याची भूमिका ठेवली होती. मात्र, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक पोलिसांत तक्रार करण्यावर ठाम राहिले. 
        शटर उचकटून यामध्ये गॅसची टाकी,स्वयंपाकाची लोखंडी शेगडी,२०० ताटे,१५ डिश या साहित्यांची चोरी करण्यात आली आहे. याबाबत माळेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article