
चोपडजच्या सरपंच अपात्रतेचा कोणताही निर्णय झाला नाही
Monday, August 16, 2021
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - बारामती तालुक्यातील चोपडज ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ पुष्पलता बाळासो जगताप यांच्या अपात्रतेचा कोणताही निर्णय झाला नाही.
सहा महिन्यापूर्वी पार पडलेल्या चोपडज ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महिला शिक्षिका पुष्पलता जगताप यांनी रितसर शिक्षण संस्थेची परवानगी घेऊन निवडणूक लढवून विजयी झाल्या आणि त्या सरपंचपदी विराजमान झाल्या. तेव्हापासून गावातील विरोधी गटाच्या सौ. जयश्री गाडेकर यांच्यासह तीन सदस्यांनी सुशिक्षित महिला सरपंच नको म्हणून त्यांना नाहक त्रास देण्यासाठी पंचायत समिती कडे लेखी तक्रार केल्याने त्यांना दि.११/८/२१ रोजी दिलेल्या माहितीसाठी पत्रात सरपंच यांचे लेखी म्हणणे मागवले आहे. अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्यांना असल्याने अजून त्यावर कोणताही अंतिम निर्णय झाला नाही.