
माती परीक्षण काळाची गरज
Tuesday, August 17, 2021
Edit
बदलत्या काळानुसार हळूहळू जमिनीचा पोत, उत्पादकता ढासळत चाललेली आहे. त्यासाठी जमिनीला आवश्यक तेवढेच खत दिले गेले पाहिजे आणि ते ठरवण्यासाठी माती परीक्षण करणे काळाची गरज बनली आहे . यालाच अनुसरून कृषी कन्या निकिता तानाजी गायकवाड हिने पिंपरे खुर्द गावात माती परीक्षणाचे प्रात्याक्षिक दिले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय ,अकलूज अंतर्गत आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत मातीचा नमुना कसा घ्यावा? कोणत्या ठिकाणी घ्यावा ? कोणत्या ठिकाणी घेऊ नये ? याचे मार्गदर्शन पिंपरे खुर्द गावात झाले . त्या करीता महाविद्यालयाचे समन्वय डॉ. डी. पी. कोरटकर , प्राचार्य आर. जी. नलवडे , प्राध्यापक एस. एम. एकतपुरे, प्राध्यापक एस.आर. आडत ,प्राध्यापक डी. एस. मेटकरी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी पिंपरे गावातील विजय थोपटे, विशाल थोपटे, बाळासो थोपटे, सदाशिव थोपटे, पल्लवी थोपटे उपस्थित होते.