
पिंपरे गावात कृषिकन्येकडून चारा प्रक्रियेची माहिती
Tuesday, August 17, 2021
Edit
जनावरांना कोरडा चारा म्हणून कडबा, मका,गव्हाचे काड यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे जनावरांची वाढ , प्रजननक्षमता,दूध उत्पादन कमी होते. यावर उपाय म्हणजे चारा प्रक्रिया अशी माहिती कृषिकन्या निकिता तानाजी गायकवाड हिने दिली.
चारा प्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे निकृष्ट चाऱ्यामधील पोषक घटकांची वाढ करणे त्यासाठी युरीया प्रक्रिया उपयुक्त ठरते. युरीया प्रक्रिया केल्यामुळे चाऱ्यामध्ये प्रथिन्यांचे प्रमाण 1 ते 1.5 टाक्यापासून 7 ते 8 पर्यंत वाढते. याची माहिती कृषी कन्या निकिता तानाजी गायकवाड हिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज आयोजित ग्रामीण जागृती कार्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना माहिती दिली.
त्याकरिता रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूजचे समन्वय डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर. जी. नलवडे, प्राध्यापक एस. एम. एकतपुरे, एस.आर. अडत, डी.एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. पिंपरे खुर्द गावातील विजय थोपटे, विशाल थोपटे, बाळासो थोपटे, सदाशिव थोपटे, तानाजी गायकवाड, संतोष थोपटे उपस्थित होते.