
पुजा जाधव बलात्कार व खुन प्रकरणातील साक्षीदार फुटल्यामुळे न्याय व्यवस्था फेल- माजी विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे
Thursday, August 5, 2021
Edit
मोरगाव: पुणे जिल्ह्यातील ईंदापुर तालुक्यात पुजा जाधव या मुलीच्या बलात्कार व खुन प्रकरणाला तब्बल बारा वर्षे झाली मात्र साक्षीदार फुटल्यामुळे पोलीस यंत्रणा, सरकारी वकील, घट्नेचे वार्तांकन करणारी मिडिया व न्याय व्यवस्था फेल ठरली असल्याची खंत माजी विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी व्यक्त केली.
मोरगांव नजीक ढोलेमळा येथील कुडाच्या शाळेमध्ये पुजा जाधव स्मृती सक्षमा पुरस्काराचे आयोजन महाराष्ट्र जनारोग्य महापरीक्रमा करणारे घनश्याम केळकर यांनी केले होते. यावेळी माजी आयपिएस अधीकारी सुरेश खोपडे, पुरस्कारार्थी प्रज्ञा काटे ,ज्ञानेश्वर रायते तसेच महापरीक्रमेसाठी गेलेले केळकर यांसहीत विविध मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी केळकर यांनी पुजा जाधव हिला न्याय मिळाला नसल्याने सरकारला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. कोरोना काळात रुग्णाला बेड मिळवून देणे, प्लाझ्मा मिळवुन देणे अशी असामान्य कामगिरी केल्या बद्दल प्रज्ञा काटे हिला पुजा जाधव स्मृती सक्षमा पुरस्काने सन्मानित केले . यावेळी पुढे बोलताना खोपडे यांनी सांगितले की, सध्या कोर्टात अडीच कोटी दावे प्रलंबीत असुन त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे . सध्याची गुन्हे न्याय व्यवस्था ही कालबाह्य व चुकीची असल्याचेही खंत त्यांनी व्यक्त केली.