
कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी -रासकर
Monday, August 23, 2021
Edit
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून करता येते, असे कृषिदूत सुमित रासकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज संचलित ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूत सुमित राजेंद्र रासकर यांनी शेतकऱ्यांना शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची माहिती दिली. या विषयास शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी.पी. कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलवडे, प्रा. एस.एम. एकतपुरे, प्रा. एस.आर.आडत, प्रा. डी.एस. मेटकरी , प्रा. एन.बी. गाढवे यांनी मार्गदर्शन केले.