
लाटेत स्मशानभूमी कंपाउंडचे चालू असलेले काम निकृष्ट दर्जाचे; सूचना देऊनही ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरूच
Thursday, August 5, 2021
Edit
कोऱ्हाळे - बारामती तालुक्यातील लाटे येथे स्मशानभूमी सुधारणे अंतर्गत वॉल कंपाउंडचे काम मोरया मजूर संस्था, शिरष्णे यांच्यामार्फत चालू आहे. दि.४/८/२०२१ रोजी शाखा अभियंता श्री. झारगड सो यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित ठेकेदाराला कामकाजाबाबत सूचना केल्या. त्यानंतर गावच्या सरपंच सौ. शितल खलाटे यांनी या कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता ठेकेदार मनमानी कारभार करत असून काम निकृष्ट पध्दतीने चालू असल्याचे त्यांनी पाहिले त्यामुळे त्यांनी ते काम तातडीने बंद करण्यास सांगितले.
बांधकाम विभाग पंचायत समिती, बारामती यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सदर कामाच्या दर्जाबाबत खातरजमा केल्याशिवाय पुढील काम करण्यात येऊ नये असा लेखी पाठपुरावा त्यांनी केला आहे. व याबाबत मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात येईल असेल सरपंच सौ.शितल खलाटे यांनी सांगितले.